By  
on  

पाहा Photos : सिद्धार्थ - मितालीचे हे फोटो चर्चेत, लवकरच विवाहबंधनात अडकणार दोघं

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे गोड कपल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. काही वर्षांपासून दोघं एकमेकांना डेट करत आहेत. 2019 मध्ये दोघांनी साखरपुडा केला होता. 

आता या दोघांच्या लग्नाची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना देखील आहे. सध्या सिद्धार्थ - मितालीच्या केळवणाचे कार्यक्रम सुरु आहेत. नुकतच दोघांनी अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या लग्नाला हजेरी लावली होती. या गोड कपलनी सगळ्यांचं लक्ष वेधलं. कॅमेऱ्यांनीही या सुंदर जोडीला कैद केलं. त्यामुळे सोशल मिडीयावर या दोघांचे व्हिडीओ आणि फोटो चर्चेत आले आहेत. 

 

यावेळी सिद्धार्थने लाल रंगाचा कुर्ता परिधान केला होता तर मितालीने गुलाबी रंगाची साडी. या पेहरावात ही जोडी सुंदर दिसत होती. मितालीने नुकतेच हे खास फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. 2020 मध्ये दोघांचं लग्न होणार होतं. मात्र कोरोनाग्रस्त परिस्थिती आणि लॉकडाउनमुळे लग्न पुढे ढकलण्यात आलं. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive