By  
on  

पाहा Video : अमेय वाघने पत्नीसोबत अशी लुटली विकएन्डची मजा

अभिनेता अमेय वाघ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याचे विविध व्हिडीओ, फोटो आणि ह्युमरस कॅप्शन त्याच्या चाहत्यांना आवडतात. स्क्रिनवर प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अमेय सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही त्याच्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. त्याने सुरु केलेल्या युट्यूब चॅनेलवरही एन्टरटेनिंग व्हिडीओ पाहायला मिळतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by amey wagh (@ameyzone)

 

अमेयने सोशल मिडीयावर नुकताच एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत अमेय विकएन्डच्या सुट्टीची मजा लुटताना दिसतोय. अमेय ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, कयाकिंग करताना दिसतोय. त्यामुळे या सगळ्याची त्याने चांगलीच मजा लुटली असल्याचं व्हिडीओ पाहायला मिळतय. मात्र या खास गोष्टी अमेयसाठी प्लॅन केल्या होत्या त्याची पत्नी साजिरीने. सोशल मिडीयावर अमेयच्या या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्याच्या चाहत्यांना हा व्हिडीओ आवडल्याने त्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

2017 मध्ये अमेय वाघ आणि साजिरी लग्नबंधनात अडकले होते. साजिरी ही अमेयची जवळपास 13 वर्षांपासून मैत्रीण आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive