पाहा Photos : अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा हटके डॅशिंग लुक

By  
on  

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अभिनेत्री मिताली मयेकरसोबत सिद्धार्थ विवाहबंधनात अडकणार आहे. 2019 मध्ये दोघांनी साखरपुडा केला होता. तर 2020 मध्ये दोघांचं लग्न होणार होतं मात्र लॉकडाउन आणि कोरोनाग्रस्त परिस्थितीत दोघांच्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आणि आता याचवर्षी दोघं लग्न करत आहेत.

सध्या सिद्धार्थ - मितालीच्या केळवण जेवणाचे कार्यक्रम सुरु आहेत. यातच विविध ठिकाणी जात असताना दोघं विविध पेहरावात दिसत आहेत. अभिनेत्री आरती वडगबाळकरच्या घरी देखील सिद्धार्थ - मितालीला केळवणासाठी खास आमंत्रण होतं. मात्र यावेळी साउथ स्टाईल थिमने हे केळवण ठेवण्यात आलं. 

या खास केळवणासाठी सिद्धार्थ - मितालीने साउथ इंडियन लुक केला होता. सिद्धार्थनेही लुंंगी नेसून हा साउथ लुक केला होता. या लुकमध्ये सिद्धार्थचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळाला. सिद्धार्थ सोशल मिडीयावर या खास लुकमधील फोटो शेयर केले आहेत. मितालीनेही साऊथ स्टाईल साडी नेसली होती.

लुंगी डान्स आणि येन्ना सेल्फि म्हणत सिद्धार्थने हे फोटो शेयर केले आहेत. 

Recommended

Loading...
Share