‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेतून कोणतीही पुर्वसुचना न देता आजारपणाच्या कारणास्तव काढल्याचा आरोप अभिनेत्री केतकी चितळेने केला आहे. केतकी या मालिकेत अक्काच्या मैत्रिणीची मुलगी अबोलीची भूमिका साकारत आहे. केतकी एका फेसबूक व्हिडियोद्वारे तिच्यासोबत घडलेली घटना शेअर केली आहे. केतकी म्हणते, मला ईपिलेप्सीचा त्रास आहे. यामुळे मला अचानक अॅटॅक येतात आणि त्यानंतर मला काही काळ विश्रांती घ्यावी लागते. पण सेटवर दिग्दर्शकांनी मला यापासून रोखलं. याशिवाय अर्धवट ग्लानीत असतानाही माझ्याकडून शूट करून घेतलं. त्यानंतर माझ्या भूमिकेला टीआरपी मिळत नसल्याचं कारण देत अचानक दुसऱ्या अभिनेत्रीला मालिकेत आणण्यात आलं आहे. मला याबाबत कोणतीही पुर्वसुचना न देता मालिकेतून काढण्यात आलं.’
https://www.facebook.com/vikichi/videos/10161721920490051/
केतकीचे हे आरोप दिग्दर्शक राकेश सारंग यांनी फेटाळले आहेत. ते म्हणतात केतकीचे आरोप खोटे आहेत. तिला सेटवर विश्रांतीची पुर्ण मुभा होती. पण तिच्या भूमिकेला विशेष प्रसिद्धी मिळत नव्हती. याबद्दल आम्ही प्रेक्षकांचंही मत घेतलं. त्यामुळे पुर्णविचारांतीच केतकीला मालिकेतून रिप्लेस केलं आहे’.