अक्षय - योगिताची लग्नानंतरची पहिली संक्रांत, 2020 मध्ये केलं होतं लग्न

By  
on  

अनेक ठिकाणी मकर संक्रांति साजरी केली जात आहे. तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत तिळाचे लाडू दिले जात आहेत तर गुळपोळी खाल्ली जातेय. यातच नुकतेच लग्नबंधनात अडकलेल्या जोड्या त्यांची पहिली संक्रांत साजरी करत आहेत. 

अभिनेता अक्षय वाघमारे देखील त्याची लग्नानंतरची पहिली संक्रात साजरी करतोय. 2020 मध्ये अक्षय आणि योगिता गवळी यांचं लग्न पार पडलं होतं. लॉकडाउनच्या काळात मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला होता. त्यामुळे लग्नानंतरचे अनेक सण-उत्सव दोघं एकत्र साजरे करत आहेत. 

 

संक्रांतीच्या निमित्ताने अक्षयने शुभेच्छा देत योगितासोबतचा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. अक्षय या पोस्टमध्ये लिहीतो की, "दुःख सारे विसरून जाऊ,गोड-गोड बोलून आनंदाने राहु,नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,तीळ-गुळ घ्या आणि गोड-गोड बोला..मकर सक्रांतीच्या शुभेच्छा" या फोटोत दोघांनी काळ्या रंगाच कपडे परिधान केले आहेत. योगिताने काळ्या रंगाची साडी नेसली आहे तर अक्षयने काळ्या रंगाचा शर्ट घातला आहे.

योगिता ही अरुण गवळी यांची मुलगी असल्याने आणि अक्षय हा अरुण गवळींचा जावई झाल्याने या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती. लग्नाचे फोटोही चर्चेत आले होते. 

Recommended

Loading...
Share