आई कुठे काय करते या मालिकेतील प्रत्येक पात्र हे महत्त्वाचं आणि प्रेक्षकांना आपलसं वाटतं. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही या मालिकेत अरुंधतीच्या भूमिकेत आहे. कधी कधी मालिकेत एखादं गाणं जेव्हा अरुंधती गाते तेव्हा ते गाणं मधुराणीच गात असते. अर्थात गाण्याची आणि सुरांची जाण असलेली मधुराणी मालिकेतही गाताना दिसते. याशिवाय या मालिकेतील आणखी एक अभिनेत्री आहे जी उत्तम गाते. ही अभिनेत्री म्हणजे गौरी कुलकर्णी.
गौरी ही या मालिकेत यशची मैत्रीण गौरीच्या भूमिकेत आहे. मात्र गाण्याची आवड आणि त्याची जाण असल्याने गौरीकडे एक उत्तम संधी चालुन आली. या मालिकेच्या एका एपिसोडचं ओरिजिनील कम्पोझिशन गायची संधी गौरीला मिळाली आहे. एवढच नाही तर हे गाणं गौरीने प्रसिद्ध गायक आणि इंडियन आयडॉल फेम अभिजीत सावंतसोबत गायलं आहे.
गौरीने याविषयी सोशल मिडीयावर माहिती देऊन सगळ्यांना सरप्राईज दिलं आहे. याशिवाय मालिकेच्या टीमचेही यासाठी आभार मानले आहेत.