By  
on  

मायदेशी आल्यानंतर संतोष जुवेकर अखेर परतला घरी, सध्या आहे होम क्वारंटाईन

कोरोनानंतर आता ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार आढळल्याने काही देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली होती. त्यामुळे सामान्य नागरिकांसोबत लंडनमध्ये चित्रीकरणासाठी गेलेले कलाकार लंडनमध्ये अडकले होते. यापैकीच एक होता अभिनेता संतोष जुवेकर. लंडनमध्ये तो सिनेमाच्या चित्रीकरणासाठी गेला होता. चित्रीकरणाचा कालावधी संपल्यानंतर संतोष त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी लंडनमध्ये राहिला होता. मात्र तिथे अचानक लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने संतोष तिथेच अडकला होता. संतोष आता मायदेशी परतला आहे. मायदेशी परतल्यावर संतोषने सोशल मिडीयावर पोस्ट करून तो परतल्याची बातमी सगळ्यांना दिली. 

मायदेशी परतल्यावर संतोषला हॉटेल क्वारंटाईन करण्यात आलं होतं. मात्र आता संतोष त्याच्या घरी परतला आहे. घरात एकटाच राहून तो आता होम क्वारंटाईन आहे. याविषयी संतोषने एक गमतीशीर पोस्ट सोशल मिडीयावर शेयर केली आहे. 

 

संतोष या पोस्टमध्ये लिहीतो की, "आलो बाबा घरी एकदाचा. कोरोना निगेटिव्हचा यंदाचा पुरस्कार पटकावलाय मी त्याचा आनंद आता काही दिवस एकटाच घरात राहून enjoy करणार, hotel quarantine मधून आता home quarantine ची मज्जा." तेव्हा सध्या संतोष होम क्वारंटाईन असल्याचं या पोस्टमधून सांगतोय. 

Recommended

PeepingMoon Exclusive