By  
on  

सिद्धार्थ चांदेकरच्या या सहकलाकाराने शेयर केली त्याच्याविषयीची ही गोष्ट

'सांग तू आहेस का' ही मालिका एका रहस्यमयी वळणावर असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे वैभवीचा आत्मा स्वराजच्या अवतीभवती असतो. त्याच्या आयुष्यात सुरु असलेल्या गोष्टींकडेही वैभवीच्या आत्माचं लक्ष असल्याच पाहायला मिळतं. या मालिकेत अभिनेत्री सानिया ही वैभवीची व्यक्तिरेखा साकारतेय. 

या मालिकेच्या निमित्ताने हे सिद्धार्थ आणि सानिया पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळत आहेत. या मालिकेतील त्यांची केमिस्ट्री जितकी चांगली तितकीच ऑफस्क्रिन मैत्रीही झाली आहे. आणि याचविषयी सानियाने नुकतीच सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे. 

 

सानिया या पोस्टमध्ये सांगते की, "ऑनस्क्रिन माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारा स्वराज आणि ऑफस्क्रिन मला सगळ्यात जास्त त्रास देणारा सिद्ध्या." तेव्हा सिद्धार्थ हा ऑफस्क्रिन सानियासोबत मस्ती करतो तिला त्रास देतो, हे या गमतीशीर पोस्टमधून कळतय.  या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. शिवानी, सानिया आणि सिद्धार्थची सेटवर चांगलीच मैत्री झाल्याचं त्यांच्या सोशल मिडीया पोस्टवरून पाहायला मिळतय. 

मात्र वैभवीचा आत्मा सिद्धार्थच्या आयुष्यात काय नवं वळण घेऊन येतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive