By  
on  

मराठी सिनेमाचं हिंदी शीर्षक, प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'रूप नगर के चीते'

अनेक मराठी सिनेमांचे शीर्षक हे लक्षवेधी ठरले आहेत. त्यातच आगामी सिनेमाचं शीर्षकही प्रेक्षकांचं लक्ष वेधणार एवढं नक्की. कारण हे शीर्षक हिंदीत आहे. यामागे एक महत्त्वाचं कारणही आहे. 'रूप नगर के चीते' असं या मराठी सिनेमाचं नाव आहे. मात्र 90 च्या दशकात प्रदर्शित झालेल्या एका हिंदी सिनेमात असलेल्या  'हम रूप नगर के चीते है, शिकार पर ही जीते है' या प्रसिद्ध संवादावरून हे शीर्षक प्रेरीत आहे. दोन जीवलग मित्रांवर आधारित हा सिनेमा आहे. 

बॅालीवुडमधील सुप्रसिद्ध फिल्ममेकर विपुल अमृतलाल शाह यांचे पुतणे संगीतकार मनन शाह यांनी एस एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली 'रूप नगर के चीते' या मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे. प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या 'स्कूल, कॅालेज आणि लाईफ' या आगामी पहिल्या मराठी सिनेमाचं दिग्दर्शन करणारे विहान सूर्यवंशी हे 'रूप नगर के चीते'चं दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमात दोन मित्रांच्या कथेसोबतच मैत्रीतील आजवर कधीही न उलगडलेले काही दुर्लक्षित पैलू सादर करण्यात आले आहेत. 'रूप नगर के चीते' हा सिनेमा दोन बालमित्रांचा रोमहर्षक प्रवास आणि एक घटना घडल्यानंतर त्यांचं दोन भिन्न शहरांतील विरोधाभासी जीवन दर्शवणारा आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये या सिनेमाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ होणार आहे. या निमित्तानं मराठीतील दोन मित्रांचा ऑनस्क्रीन प्रवास आणि त्यांची अनोखी कथा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. 

लक्षवेधी शीर्षक आणि उत्कंठावर्धक कथानक असलेला 'रूप नगर के चीते' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive