ब-याच कालावधीनंतर प्रथमेश परब रंगभूमीवर, दहा बाय दहामधून येणार रसिकांसमोर

By  
on  

आपल्या सर्वांचा लाडका 'दगडू' आता एका नव्या अंदाजात प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करण्यास येत आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठा पडदा गाजवणारा प्रथमेश परब, आगामी 'दहा बाय दहा' या नाटकाद्वारे पुन्हा एकदा रंगभूमीवर परतला आहे. 'दहा बाय दहा' हे धमाल कौटुंबिक नाटक गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वरूप रिक्रिएशन अँड मीडिया प्रा. लि. निर्मित व अष्टविनायक प्रकाशित या नाटकाचे दिग्दर्शन अनिकेत पाटील याने केले असून, त्याचे लेखन संजय जमखंडी आणि वैभव सानप यांनी केले आहे.
एका मध्यमवर्गीय कुटुंबाची भन्नाट गोष्ट सांगणारे हे नाटक रसिकांना हास्याची परिपूर्ण मेजवानी देणारे ठरणार आहे. 'दहा बाय दहा'ची चौकट तोडायला निघालेल्या या नाटकामध्ये हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील एका नावाजलेल्या विनोदवीराचादेखील समावेश आहे. विशेष म्हणजे, तब्बल २० वर्षानंतर हे विनोदवीर मराठी रंगभूमीवर परतणार असल्याकारणामुळे, या नाटकाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Recommended

Loading...
Share