अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचा विवाहसोहळा सध्या पार पडतोय. पुण्यात दोघांच्या लग्नाचे विविध कार्यक्रम पार पडले. आता दोघांचा लग्नसोहळा पार पडतोय. नुकताच दोघांचा हळदी समारंभ पार पडला आहे. नुकताच मानसी - प्रदीपच्या हळदी समारंभाचे व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत.
मानसीच्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी तिचा मित्रपरिवार उपस्थित होता. मानसीची खास मैत्रीण अभिनेत्री दिपाली सय्यदने या खास कार्यक्रमांना हजेरी लावली होती.
यावेळी मानसी आणि प्रदीप दोघांनी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते.