By  
on  

पाहा Photos : अभिनेत्री मानसी नाईकने प्रदीप खरेरासोबत बांधली लगीनगाठ

अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा या कपलच्या लग्नाची चर्चा मागील वर्षापासून होती. मागील वर्षी दोघांनी साखरपुडाही केला होता. आणि या वर्षी 2021मध्ये दोघांनी लग्न करायचं ठरवलं. नुकतच हे गोड कपल लग्नबंधनात अडकले आहेत. पुण्यात मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मानसी नाईक आणि प्रदीप खरेराचा लग्नसोहळा पार पडला आहे. या लग्नसोहळ्याचे एक्सक्लुझिव्ह फोटो पिपींगमूनच्या हाती आले आहेत.

मानसीचे मेहंदी, संगीत, हळदी कार्यक्रमही अतिशय उत्साहात पार पडले. यावेळी मानसीच्या मित्रपरिवाराची हजेरी पाहायला मिळाली. यावेळी मानसीने लाल रंगाचा खास लेहेंगा परिधान केला होता. तर प्रदीपने शेरवानी परिधान केली होती. 

व्हा मानसी नाईक आता मिसेस खरेरा झाली आहे. या लग्नाचे खास फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मिडीयावरही चर्चेत आले आहेत. ते

या विवाहसोहळ्यासाठी मानसीने खास जोधा अकबर सिनेमातील ऐश्वर्या राय बच्चन सारखा लुक केला होता. मानसी या पेहरावात अतिशय सुंदर दिसत आहे. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive