अभिनेता सौरभ गोखले म्हणतो "आपल्या पत्नीच्या निवडीवर कधीही हसू नका", हे आहे कारण

By  
on  

अभिनेता सौरभ गोखले आणि अभिनेत्री अनुजा साठे ही मराठी मनोरंजन विश्वातील गोड जोडींपैकी एक. 2013 मध्ये दोघांनी लगीनगाठ बांधली होती. नुकतच लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने सौरभने सोशल मिडीयावर एक खास पोस्ट केली आहे. 

सौरभ आणि अनुजाच्या लग्नाला नुकतीच 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने सौरभने सोशल मिडीयावर दोघांचे फोटो पोस्ट केले आहेत. यात एक जुना आणि एक लेटेस्ट फोटो जोडण्यात आलाय. मात्र सौरभचं गमतीशीर कॅप्शन लक्षवेधी ठरतय.

 

सौरभ या कॅप्शनमध्ये पत्नीच्या निवडीवर कधीही न हसण्याचा सल्ला देत आहे. त्यामागचं कारणही सौरभ सांगतोय. सौरभ लिहीतो की, "आपल्या पत्नीच्या निवडीवर कधीही हसू नका कारण तुम्हीही त्यापैकीच एक आहात. 8 वर्षे पूर्ण झाली आणि अजून बाकी आहेत. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा."

 सौरभ आणि अनुजाच्या गोड फोटोंसह त्याचं हे गमतीशीर कॅप्शन लक्ष वेधतय. सौरभ, अनुजाच्या चाहत्यांनाही त्यांही ही पोस्ट आवडली असून त्यावर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Recommended

Loading...
Share