सध्या मनोरंजन विश्वात लग्नाचा सिझन सुरु आहे असचं म्हणावं लागेल. एकापाठोपाठ एक मराठी कलाकारांचे लग्न होताना पाहायला मिळत आहे. त्यातचं अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईकचं लग्न नुकतच पार पडलं. इंटरनॅशनल बॉक्सर प्रियकर प्रदीपसोबत मानसीने लगीनगाठ बांधली. लग्नानंतर मानसी तिच्या सासरी गेली आहे.
या नवविवाहित जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच प्रदीपने मानसीसोबतचा रोमँटिक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत मानसी आणि प्रदीप एखाद्या सिनेमाच्या गाण्यात दिसणाऱ्या हिरो-हिरॉईन सारखे शेतात दिसत आहेत. या व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पसंत केला जातोय.
मागील वर्षी मानसी आणि प्रदीपने साखरपुडा केला होता. 2020 मध्ये मानसीने तिच्या वाढदिवसाला तिच्या प्रदीपसोबतच्या नात्याचा खुलासा केला होता. 19 जानेवारी रोजी दोघांनी लगीनगाठ बांधली.