By  
on  

पाहा Photos : सिद्धार्थ - मितालीने त्यांच्या हळदीत अशी केली धमाल, "अरं हलद लागली" म्हणत शेयर केले हे फोटो

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांच्या लग्नाचे विविध कार्यक्रम सध्या सुरु आहेत. बऱ्याच दिवसांपासून या दोघांच्या केळवणाचे कार्यक्रम पार पडत होते. नुकताच दोघांचा हळदी समारंभ पार पडला आहे. 

या हळदी समारंभासाठी सिद्धार्थ-मितालीचा मित्रपरिवार उपस्थित होता. यावेळी डान्स करून सगळ्यांनी चांगलीच धमाल केली. सिद्धार्थ - मितालीने देखील खास परफॉर्मन्स दिले.

या हळदी कार्यक्रमाचे काही खास क्षण सिद्धार्थ आणि मितालीने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. यासाठी दोघांनी पांढऱ्या रंगाचे आणि नंतर पिवळ्या रंगाचे आउटफिट परिधान केले होते. 

येत्या 24 जानेवारीला दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. तेव्हा हा खास सोहळा सगळ्यांचं लक्ष वेधेल यात शंका नाही. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive