पाहा Photos : लग्नात इतकी सुंदर दिसली सिद्धार्थ - मितालीची जोडी, लग्नाचे हे फोटो एकदा पाहाच

By  
on  

नुकताच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचा विवाह सोहळा थाटात पार पडला. पुण्यात पारंपारिक वेशभुषेत पारंपारिक पद्धतिने हे लग्नसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्यासाठी अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती.

 

सिद्धार्थ आणि मितालीने त्यांच्या लग्नाचे सुंदर फोटो नुकतेच सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. सुरुवातीला विधीसाठी मितालीने हिरव्या रंगाची साडी नेसली होती तर सिद्धार्थने निळ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला होता. त्यानंतर मितालीने पिवळ्या रंगाची साडी गुलाबी ब्लाउज आणि सिद्धार्थने ऑफ व्हाईट कुर्ता परिधान केला होता.

या खास पारंपारिक पोषाखात दोघही सुंदर दिसत होते. मेड फॉर इच अदर असं हे कपल आता लग्नबंधनात अडकलं. तेव्हा सिद्धार्थ-मितालीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

गाथा या वेडिंग फोटोग्राफर टीमने सिद्धार्थ - मितालीच्या लग्नाचे सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद केले आहेत.

Recommended

Loading...
Share