By  
on  

'हरिओम' हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित, टिझर पोस्टर रिलीज

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास सिनेमांच्या माध्यमातून अनेकदा पाहायला मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तत्त्वे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हरीओम असं या सिनेमाचं नाव आहे. नुकतच या सिनेमाचं टिझर पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

    हा सिनेमा एक एक्शनपट असणार आहे. पोस्टरवर पिळदार शरीरयष्टी असलेले दोन तरूण पाठमोरे उभे असलेले पाहायला मिळत आहेत. शिवाय त्यांच्या खांद्यावर जय जगदंब आणि जय दुर्गे असही लिहीलं आहे. त्यांच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि किल्लाही दिसत आहे. 


    चित्रपटाचे निर्माते हरिओम घाडगे आणि दिग्दर्शक आशिष नेवाळकर यांनी सांगितले की, " हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेल्या शिवाजी महाराजांच्या स्वभावाची अनेक वैशिष्ट्ये होती. शिवाजी महाराजांच्या अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात. आमच्यासाठी देखील शिवाजी महाराज आमचे दैवतच आहे. त्यामुळे आम्ही आमची पहिली कलाकृती त्यांचा आशीर्वाद घेऊन सुरु करत आहोत. आज आमच्या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित होत असून, आम्ही ते पोस्टर महाराजांना समर्पित करीत आहोत. आम्ही आमच्या सिनेमातून महाराजांची तत्त्वे नक्कीच लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू."  
श्रीहरी स्टुडिओची प्रस्तुती असणारा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटाबाबतची  अधिकची माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive