पाहा Video : गोंधळ विधी कार्यक्रमात सिद्धार्थने उचललं मितालीला, पार पडला गोंधळ विधी

By  
on  

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. केळवणपासून ते मेंहदी, हळदी, संगीत असे विविध कार्यक्रमही पार पडले होते. केळवणापासून चर्चेत असेलेले या दोघांच्या लग्नाचे विविध कार्यक्रम सोशल मिडीयावरही चर्चेत राहिले. दोघांच्या लग्नाचे सुंदर फोटोही आता लक्षवेधी ठरत आहेत.

लग्नानंतर आता लग्नानंतरच्या विविध विधी पार पडत आहेत. नुकताच सिद्धार्थ - मितालीचा गोंधळ विधी कार्यक्रम पार पडला. यावेळी सिद्धार्थ - मितालीच्या मित्रपरिवाराने हजेरी लावली होती. 

 

या विधीसाठी मितालीने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. तर सिद्धार्थने लाल रंगाचा कुर्ता परिधान केला होता. यावेळी गोंधळाचा कार्यक्रम पार पडला. शिवाय या विधीत सिद्धार्थने मितालीला उचलुन घेतलं होतं.. या विधीचे विविध फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. 

 

सोशल मिडीयावर या नवविवाहीत जोडप्याचे विविध फोटो आणि व्हिडीओ आता चर्चेत आले आहेत. 

Recommended

Loading...
Share