By  
on  

श्रुती मराठेने शरीर संबंधांची मागणी करणा-या निर्मात्याला लगावली शाब्दिक चपराक

कलाक्षेत्रात काम करण्यासाठी, शिखरावर पोहोचण्यासाठी कलाकाराला अनेकदा जबर किंमत मोजावी लागते. यातूनच मीटू सारखी प्रकरणं जन्माला येतात. अभिनेत्री श्रुती मराठेलाही कास्टींग काऊच सारख्या प्रकरणाला सामोरं जावं लागलं. हा अनुभव तिने नुकताच शेअर केला.

https://www.instagram.com/p/Bv1WfSDncxY/?utm_source=ig_web_copy_link

'ह्यूमन ऑफ बॉम्बे’च्या सोशल मिडिया पेजला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने हा किस्सा शेअर केला. उमेदीच्या काळात श्रुतीने मराठी तसेच दाक्षिणात्य सिनेमात काम केलं आहे. यावेळी एका सिनेमाच्या निर्मात्याने तिच्याकडे सिनेमात काम देण्यासाठी शरीरसुखाची मागणी केली. याशिवाय सिनेसृष्टीत अशा तडजोडी करणं म्हणजे फार मोठी गोष्ट नाही हे देखील सांगितलं. त्यावेळी श्रुतीने त्याला विचारलं, ‘अभिनेत्री होण्यासाठी मला ‘वन नाईट स्टॅण्ड’ करावं लागतं तर हिरो होण्यासाठी त्याला काय करायला सांगता तुम्ही ?’ तिच्या या रोकठोक बोलण्याने तो निर्माता सटपटला. श्रुतीच्या या सडेतोड बोलण्यामुळे तिला वाईट घटनांपासून लांब राहता आल्याचंही त्तिने यावेळी नमूद केलं.

Recommended

PeepingMoon Exclusive