या नव्या वर्षात अनेक सेलिब्रिटींनी लगीनगाठ बांधली. यात अभिनेत्री मानसी नाईकही आहे. मागील वर्षी मानसी आणि प्रियकर प्रदीपने साखरपुडा केला होता. आणि या वर्षी लग्न करण्याचं ठरलं. 19 जानेवारी रोजी मानसी आणि प्रदीप लग्नबंधनात अडकले आणि मानसी झाली मिसेस खरेरा.
मानसीच्या लग्नाच्या विविध कार्यक्रमांची चर्चा चांगलीच रंगली. सोशल मिडीयावरही लग्नाच्या कार्यक्रमाचे विविध फोटो, व्हिडीओ चर्चेत राहिले. मानसी आणि प्रदीप ही जोडी लग्नात मेड फॉर इच अदर अशी जोडी दिसत होती. लग्नाच्या फोटोंचीही बरीच चर्चा झाली. सोशल मिडीयावर हे फोटो चांगलेच व्हायरल झाले.
मानसी आणि प्रदीपने याच लग्नसोहळ्याचे आणखी खास फोटो शेयर केले आहेत. हे फोटो शेयर करत मानसी लिहीते की, "हे फक्त गाठ बांधण्याबद्दल नाहीए, तर ही गाठ घट्ट ठेवण्याबद्दलही आहे." दोघांच्या लग्नाचे हे नवे फोटोही पसंत केले जात आहेत.