By  
on  

पाहा Video : डेहराडूनमधील भर थंडीत पुष्कर जोग आणि मंजिरी करत आहेत शूटिंग

अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री मंजिरी फडणीस ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे.  'अदृश्य' या मराठी सिनेमात दोघं एकत्र झळकणार आहेत. नुकतच या सिनेमातील त्यांचे लुकही समोर आले आहेत. डेहराडून येथे या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. बॉलिवुडचे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर कबीर लाल या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.

 

सध्या डेहराडून येथे या सिनेमाचं चित्रीकरण सुरु आहे. तेथील कडाक्याच्या थंडीत आणि धुक्यात पुष्कर आणि मंजिरी त्यांच्या शुटींगची मजा लुटत आहेत. अभिनेता पुष्करने नुकतच या सिनेमाच्या सेटवरील व्हिडीओ शेयर केला आहे. तेव्हा शॉट दरम्यान पुष्कर आणि मंजिरी थंडीने कुडकुडत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतय. या थंडीत आणि धुक्यात पुष्कर आणि मंजिरी मस्ती करताना पाहायला मिळत आहेत. तेव्हा ही जोडी ऑनस्क्रिन कशी दिसेल हे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर समोर येईलच.या सिनेमात पुष्कर जोगचा वेगळा लुक पाहायला मिळतोय. 

Recommended

PeepingMoon Exclusive