By  
on  

पाहा Video : नव्या अनिता भाभीच्या रुपात नेहा पेंडसेचं खास फोटोशूट

भाबीजी घर पर है ही लोकप्रिय मालिका आता वेगळ्या रुपात पाहायला मिळतेय. कारण या मालिकेतील एक महत्त्वाचं पात्र मालिकेत नव्या रुपात आलं आहे. अनिता भाबी म्हणजेच या मालिकेतील गोरी मेमची भूमिका आता पुन्हा एकदा पाहायला मिळतेय. या भूमिकेत आता अभिनेत्री नेहा पेंडसे दिसत आहे. अभिनेत्री सौम्या टंडन अनिता भाभीची भूमिका साकारत होती. मात्र तिने या शोमधून एक्झिट घेतली. त्यानंतर या भूमिकेत कोण झळकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मग नेहा पेंडसेच्या नावावर शिक्का मोर्तब झाला. या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्येही नेहाची गोरी मेमच्या रुपात दमदार एन्ट्री पाहायला मिळत आहे.

सोशल मिडीयावरही नेहाच्या या नव्या भूमिकेची चर्चा सुरु आहे. यातच सध्या नेहा या मालिकेसाठी शूटिंग करत आहे. प्रोमो आणि फोटोशूटच्या शूटिंगमध्ये नेहा व्यस्त आहे. नुकतच नेहानी फोटोशूटचा बिहाइंड द सीन व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत नेहा साडी लुकमध्ये पाहायला मिळतेय. गोरी मेमच्या लुकमधील या फोटोशूटमध्ये नेहा सुंदर दिसतेय. या मालिकेती इतर कास्टसोबतही नेहाने फोटोशूट केलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

 

तेव्हा इतकी वर्षे सौम्या टंडन साकारत असलेली भूमिका आता नेहाच्या रुपात प्रेक्षक पसंत करतील का हे समोर येईलच. याआधीही या मालिकेतील अंगूरी भाभीच्या भूमिकेतील अभिनेत्री रिप्लेस करण्यात आली होती. अभिनेत्री शिल्पा शिंदे अंगूरी भाभीच्या भूमिकेत होती.  त्यानंतर आता शुभांगी अत्रे अंगूरी भाभीची भूमिका साकारत आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive