पाहा Photos : या लूकमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर दिसली सुपरकुल

By  
on  

सोशल मिडीयावर अभिनेत्री सई ताम्हणकरचे फोटो मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. सई ताम्हणकर तिच्या सोशल मिडीयावर तिचे लेटेस्ट फोटोशूट आणि अपडेट्स पोस्ट करताना दिसते. सईची मनोरंजन विश्वात फॅशन, स्टाईल आयकॉन म्हणूनही ओळख आहे.

सईने नुकतेच तिचं लेटेस्ट फोटोशूट सोशल मिडीयावर शेयर केलं आहे. या फोटोशूटमधील फोटोंना मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसतेय. या फोटोशुटमध्ये सईचा सुपरकुल लूक पाहायला मिळतोय.

डेनिम पॅन्ट, हाय हिल्स आणि रंगीबेरंगी असं जॅकेट घातलेला हा लूक आहे. या लूकमध्ये सई सुपरकुल अंदाजात दिसत आहे. 

सईच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होताना दिसत आहे. फोटोग्राफर खुशबूने हे सुंदर फोटो क्लिक केले आहेत. आगामी काळात सई ही 'इंडिया लॉकडाउन', 'मिमी', 'मिडीयम स्पायसी' या सिनेमांमध्ये झळकणार आहे.

Recommended

Loading...
Share