By  
on  

रिंकू राजगुरुने साजरा केला ‘कागर’मय गुढीपाडवा, लावली शोभायात्रेत हजेरी

अभिनेत्री रिंकू राजगुरुचं वेड सगळ्या महाराष्ट्राला आहे. सध्या तिचा ‘कागर’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अलीकडेच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. त्याला रसिकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. ‘सैराट’नंतर इतक्या मोठ्या कालावधीने रिंकूच्या आगामी सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे . ‘गुढीपाडव्याचा मुहुर्त साधुन रिंकूने कागरचं प्रमोशनही केलं. रिंकू सहकलाकार शुभंकर तावडेसह पाडव्याच्या शोभायात्रेत आली होती. साडी नेसलेली आणि डोक्यावर फेटा ल्यालेली रिंकू सुंदर दिसत होती. यावेळी तिने सर्वांना शुभेच्छा दिल्या. ‘कागर’ सिनेमामधील रिंकूच्या लूकची यापूर्वी बरीच चर्चा झाली. तिने या सिनेमासाठी आपलं बरंचसं वजन घटवले आहे. या सिनेमासिनेमाची निर्मिती सुधीर कोलते' आणि 'विकास हांडे' यांच्या' उदाहरणार्थ' या निर्मिती संस्थेने केली आहे. मकरंद माने या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत

[video width="480" height="854" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2019/04/WhatsApp-Video-2019-04-06-at-12.06.53-PM.mp4"][/video]

Recommended

PeepingMoon Exclusive