लग्नानंनतर या ठिकाणी फिरायला गेले आहेत सिध्दार्थ-मिताली

By  
on  

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. मोठ्या धुमधडाक्यात पुण्यातील ढेपेवाडा येथे ही जोडी विवाहबंधनात अडकली. गेल्या कित्येक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. त्यामुळे हा लग्नसोहळा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ठरत होता. मात्र,24 जानेवारी रोजी रविवारी अखेर कुटुंब आणि  मित्र-परिवाराच्या साक्षीने त्यांनी सप्तपदी घेतल्या. सिध्दार्थ मितालीच्या लग्नसोहळ्यासाठी अनेक प्रसिध्द मराठी कलाकार आवर्जुन उपस्थित होते. करोना आणि लॉकडाऊनमुळे असं लग्न कोणालाच एन्जॉय करता आलं नव्हतं. त्यामुळे सर्वांनीच या लग्नात आपली नटण्या-मुरडण्याची हौस मनसोक्त पुरवली. 

लग्नानंतर नुकतंच हे नवविवाहित जोडपं फिरायला गेलं आहे. तेथील त्यांचे चील आऊट करतानाचे फोटो सोशल मिडीयावर समोर आले आहेत. 

 

सिध्दार्थ -मिताली लोणावळा येथील द मचाण या रिसॉर्टवर लग्नानंतर टाईम स्पेंड करतायत. बहुधा दोघांच्याही मालिकांच्या व्यस्त शेड्यूलमुळे त्यांना मोठी सुट्टी घेणं शक्य नसेल.  म्हणूनच त्यांनी छोटा ब्रेक धेतला असावा. 

 

सिध्दार्थ-मितालीच्या या चिलींग मूडवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

Recommended

Loading...
Share