By  
on  

अभिनेत्री प्राजक्ता माळीवर फॅशन डिझायनरने केला मारहाणीचा आरोप, तक्रार दाखल

कलाकार आणि विवाद यांचं नातं फार जुनं आहे. एखाद्या विवादामुळे कलाकाराची प्रतिमाही पणाला लागलेली असते. विवादांच हे वारं मराठी सिनेसृष्टीलाही लागलेलं दिसत आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीवर तिच्या फॅशन डिझायनरने मारहाणीचा आरोप केला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्यावेळी या प्रकार घडला.

प्राजक्ताने शो दरम्यान दिलेले कपडे योग्य नसल्याच्या कारणावरून आपल्याला मारहाण तसेच शिवीगाळ केल्याची तक्रार फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा हिने केली आहे. या प्रकरणाशी संबंधित प्राजक्ता आणि जान्हवी यांच्या संभाषणाचा व्हॉट्स अ‍ॅप स्क्रीनशॉटही व्हायरल झाला आहे. यामध्ये या प्रकरणाबद्दल तक्रार नोंदवणार असल्याचं जान्हवी म्हणत आहे.

तर तुझ्यासोबत झालेल्या प्रकाराला मारहाणीचं नाव देऊ नको. माझे वडील पोलिस आहेत आणि माझे काका वकिल असल्याने मारहाण कशाला म्हणतात हे मला चांगलं ठावूक आहे. तरीही तुला तक्रार करायची असेल तर करू शकतेस. पण तुझ्या या आतातायीपणा खाली तुझी चुक आणि बेजबाबदार वर्तन लपवू नको.’ असा मेसेज प्राजक्ताने जान्हवीला केला आहे. पोलिसांनी प्राजक्ताविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून यावर तिची काय प्रतिक्रिया आहे ते समजू शकलं नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive