By  
on  

पाहा Video : शॉट सुरु असतानाच शिंकली ही अभिनेत्री, शेयर केला मजेशीर व्हिडीओ

'सांग तू आहेस का' या मालिकेतील विविध वळणं मालिकेला आणखी रंजक बनवत आहेत. या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे, सिद्धार्थ चांदेकर आणि सानिया चौधरी मुख्य भूमिकेत आहेत. हे कलाकार सोशल मिडीयावरही सक्रिय असतात. तेव्हा सेटवरील अनेक अपडेट्स ते सोशल मिडीयावर शेयर करत असतात.

 

नुकतच शिवानीने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेयर केला आहे.  या व्हिडीओत शिवानी सिद्धार्थसोबत तिचा शॉट देताना दिसत आहे. हा शॉट देत असताना शिवानी अचानक शिंकते आणि सिद्धार्थही हसू लागतो. शिवानीने हा मजेशीर बिहाईंड द सीन व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. शिवानीचा हा गमतीशीर व्हिडीओ नेटकऱ्यांनाही प्रचंड आवडला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive