अभिनेत्री मानसी नाईकने नव्या वर्षात लगीनगाठ बांधली आणि ती झाली मिसेस खरेरा. मागील वर्षी मानसीने तिच्या वाढदिवसाला याच दिवशी ती प्रेमात असल्याची कबुली दिली होती आणि तिच्या प्रदीपसोबतच्या नात्याचा खुलासा केला होता. मागील वर्षी दोघांनी साखरपुडाही केला.
या वर्षाच्या सुरुवातीला मानसी आणि प्रदीप विवाहबंधनात अडकले. या लग्नाचे विविध कार्यक्रम पुण्यात पार पडले. सोशल मिडीयावर चर्चेत असलेलं हे कपल आता लग्नानंतरही लक्ष वेधतय. मानसी - प्रदीपचे रोमँटिक फोटो, व्हिडीओ कायम चर्चेत असतात. लग्नानंतरचा नवा व्हिडीओही आता सगळ्यांचं लक्ष वेधतोय.
मानसीने नुकताच एक रोमँटिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत दोघांनी कॉम्बिनेशन केलेलं रेड एन्ड व्हाईट आउटफिटही घातलय. या व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पसंत केला जातोय. लग्नानंतर मानसी तिच्या सासरी गेली आहे. तिच्या सासरचे व्हिडीओ आणि फोटोी तिने शेयर केले आहेत.