अभिनेता चिन्मय मांडलेकरवर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीयावरही मनोरंजन विश्वातील मित्रमंडळींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चिन्मयचा खास मित्र आणि अभिनेता, दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रसाद ओकनेही चिन्मयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Happy birthday चिन्या...
तुझ्यातल्या "लेखकाला, दिग्दर्शकाला, कवीला, निर्मात्याला, अभिनेत्याला, आणि याउपर तुझ्यातल्या "सच्च्या मित्राला" वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा...!!!
"कच्चा लिंबू", "हिरकणी" नंतर या वर्षी "चंद्रमुखी" नी आपली hattrick होणार
Love u @cdmandlekar pic.twitter.com/LH3wavfzf1— Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) February 2, 2021
प्रसाद ओकने सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे. प्रसादने चिन्मयसोबतच फोटो शेयर केला आहे. प्रसाद चिन्मयला लाडाने चिन्या म्हणून संबोधत असल्याचं या पोस्टमधून पाहायला मिळतय. आपल्या खास मित्राला शुभेच्छा देताना प्रसाद लिहीतो की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा चिन्या... तुझ्यातल्या "लेखकाला, दिग्दर्शकाला, कवीला, निर्मात्याला, अभिनेत्याला, आणि याउपर तुझ्यातल्या "सच्च्या मित्राला" वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा...!!! "कच्चा लिंबू", "हिरकणी" नंतर या वर्षी "चंद्रमुखी"नी आपली हॅट्रीक होणार"