By  
on  

पाहा Video : या कपलने मुन्नारमध्ये असं केलं लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

अभिनेता अभिजीत आणि अभिनेत्री सुखदा खांडकेकर ही जोडी मनोरंजन विश्वातील गोड जोड्यांपैकी एक. ही रियल लाईफ जोडी सोशल मिडीयावरही कपल गोल्स देताना दिसते. या गोड कपलने नुकतच त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन केलं आहे.

या खास सेलिब्रेशनसाठी अभिजीत आणि सुखदा खास ट्रीपला गेले होते. यासाठी त्यांनी मुन्नार या निसर्गरम्य ठिकाणाची निवड केली आहे.  मुन्नार येथील त्यांच्या ट्रीपचे काही फोटोही त्यांनी शेयर केले आहेत.

 

नुकतच अभिजीत आणि सुखदाने या खास ट्रीपमधील व्हिडीओही सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. नेटकऱ्यांनाही त्यांच्या या पोस्ट प्रचंड आवडल्या आहेत. 

अभिजीत आणि सुखदाचे हे फोटो, व्हिडीओ पाहुन त्यांनी या ट्रीममध्ये धमाल केल्याचं पाहायला मिळतय. सोशल मिडीयावर या कपलचा मोठा चाहतावर्ग आहे. त्या चाहत्यांनीही या गोड कपलच्या पोस्टना पसंती दिली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive