सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे. मराठी सिनेमातील लव्हबर्डस सुव्रत जोशी आणि सखी गोखले हे देखील लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. ‘टाईम्स ऑफ इंडियाला’ दिलेल्या मुलाखतीमध्ये सखी आणि सुव्रतने लग्नाची तारीख देखील शेअर केली आहे. सखीला याबद्दल विचारलं असता ती म्हणाली, ‘हो मी आणि सुव्रत लग्न करत आहोत. सखी आणि सुव्रत ११ एप्रिलला लग्नबंधनात अडकणार आहेत. या व्यतिरिक्त आणखी काही सांगायला सखीने नकार दिला.
https://www.instagram.com/p/BvrKBuvH1LC/?utm_source=ig_web_copy_link
सखीने नुकताच एक फोटो शेअर केला होता. यात तिने ‘बी’ या आद्याक्षरापासून सुरुवात होणारं सॅशे घातलं होतं. आता हे सॅशे ‘ब्राईड टू बी’ चं आहे हे कळायला फार वेळ लागला नाही. यात ती तिच्या मित्रमैत्रिणींसोबत दिसत होती. त्यामुळे ही सखीची बॅचलोरेट पार्टी आहे यात कुणालाही शंका नव्हती. तेव्हापासून या जोडीच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. आता सईच्या उत्तरामुळे या चर्चांवर पडदा पडला आहे.