By  
on  

पाहा Photos : या अभिनेत्रीचं साडीसोबत आहे एक खास नातं

साडी हे एक असं वस्त्र आहे ज्यात स्त्रीचं सौंदर्य आणखी खुलुन दिसतं असं म्हटलं जातं. सोशल मिडीयावर तर एखाद्या अभिनेत्रीने साडी लुकमधील एक फोटो जरी शेयर केला तर त्यावर लाईक्सचा वर्षाव होताना दिसतो. याच साडीसोबत एका अभिनेत्रीचं खास नातं असल्याचं ती सांगते. ही अभिनेत्री आहे सुखदा खांडकेकर.

सुखदाने सोशल मिडीयावर तिचे साडीतील काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये सुखदा सुंदर दिसतेय. बिचवर हे फोटोशूट करण्यात आलय. निळ्या - पांढऱ्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेली ही साडी आहे. 

सुखदा या पोस्टमध्ये साडीसोबतच्या तिच्या नात्याविषयी लिहीते की, "माझ्या प्रत्येक साडीसोबत माझं एक खास नातं आहे. माझ्या साड्या या माझा भाग होऊन जातात. माझ्या शरीराच्या विस्तारासारखे. त्याचं फॅब्रिक माझ्या मूडनुसार काम करते, माझ्या ऊर्जा आणि शांततेच्या वतीने वागतात.."

सुखदा तिच्या साडी विषयी या गोष्टी सांगते. शिवाय पति अभिजीत खांडकेकर ज्याने हे सुंदर फोटो क्लिक केले आहेत त्याचाही उल्लेख करते. सुखदाने अनेकदा तिच्या साडी लुकमधील फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. मात्र या पोस्टमधून तिचं साडीप्रेम पाहायला मिळतय. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive