By  
on  

असा आहे, सलमान खानचा ‘भारत’मधला लूक ; शूटींगला सुरुवात

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान लवकरच एका नव्या सिनेमाद्वारे चाहत्यांच्या भेटीला येत आहे. सलमान खानचा आगामी सिनेमा ‘भारत’ची शुटींग जोरदार सुरू असून या सिनेमातील त्याचा लूक समोर आला आहे. सलमानचा स्टायलिस्ट अश्ले रिबेलोने त्याचा हा सिनेमातील लूक ट्विटरद्वारे उलगडला आहे.

अल्ली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’ सिनेमातील सलमानचा लूक पोस्ट करत अश्ले रिबेलोने म्हटलं आहे,“भारत सिनेमाच्या शूटींगचा सिनेमाचा आजचा पहिला दिवस पूर्ण झाला आहे, अजून बरेच दिवस बाकी आहेत. तुम्हाला हे माहित असेलच, अली अब्बास जफर यांच्यासोबत तो तिस-यांदा काम करत आहे.‘सुलतान’ आणि ‘टायगर जिंदा है’मध्ये यापूर्वी दोघांनी काम केले आहे.”

दिग्दर्शक अल्ली अब्बास जफर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर या सिनेमाच्या शूटींगची यापूर्वी माहिती दिली होती. सलमान खानसोबत फोटो शेअर करत लिहलं होतं, “आम्ही पुन्हा एकत्र आहोत....’भारत’ची शूटींग आजपासून सुरू होत आहे. देवाची आमच्यावर कृपा असू दे,” असं म्हणत त्यांनी दिशा पटानी, सलमान खान, प्रियंका चोप्रा, सुनील ग्रोव्हर यांना टॅग केलं होतं.

अशी माहिती मिळतेय की, सलमानसोबतच प्रियंकासुध्दा मेकअपच्या साह्याने विविध लुकमध्ये दिसून येईल. कोरियन सिनेमा ‘ओड टु माय फादर’या ब्लॉकब्लस्टर सिनेमाचा हा रिमेक असल्याचे बोलले जात आहे. एका मुलाची ही कथा असून त्याला लहानपणापासून विभक्तपणाचं दुख: सहन करावं लागतं. पण तो आपल्या कुटुंबाला नेहमी एकत्र ठेवण्याचं वचन देतो. पण ही वचनपूर्ती करण्यासाठी त्याला तब्बल 60 वर्षे लागतात आणि या 60 वर्षात खुप काही बदलून गेलेलं असतं. हीच सिनेमाची मूळ कथा आहे.

सलमान खान आणि प्रियंका चोप्राची प्रमुख भूमिका असलेला ‘भारत’ या सिनेमाच्या शूटींगला सुरूवात झाली आहे. सलमान खान मुख्य भूमिकेत असून प्रियंका चोप्रा त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसेल तर दिशा पटानीला बहिणीच्या भूमिकेत पाहायला मिळेल. तसंच नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार या सिनेमात जॅकी श्रॉफसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. त्यामुळेच तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘भारत’च्या प्रदर्शनाची सर्वांनाच उत्सुकता आहे.

 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive