By  
on  

शिवाजी साटम आणि अलका कुबल तब्बल २३ वर्षांनी 'वेडिंगचा शिनमा'साठी एकत्र

डॉ. सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या वेडिंगचा शिनेमाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली असताना या चित्रपटातील अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. चित्रपटात अनेक आघाडीच्या कलाकारांबरोबरच शिवाजी साटम आणि अलका कुबल ही जोडी या चित्रपटात महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारात आहेत. तब्बल २३ वर्षांनी ते या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर एकत्र आले आहेत. सीआयडीफेम शिवाजी साटम आणि माहेरची साडीमुळे आजही लक्षात राहिलेली अलका कुबल यांचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग आहे. हे दोघे तब्बल दोन दशकानंतर एकत्र येत असल्याने या चित्रपटाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. बहुप्रतीक्षित वेडिंगचा शिनेमा’ १२ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

वेडिंगचा शिनेमामध्ये अनेक कसदार अभिनेते आहेत. त्यामध्ये आघाडीची अभिनेत्री मुक्ता बर्वे, कॉमेडीचा बादशहा भाऊ कदम आणि लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याबरोबर अश्विनी काळसेकर, संकर्षण कऱ्हाडेप्राजक्ता हणमगरयोगिनी पोफळे, शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार हे कलाकारसुद्धा दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा सलील कुलकर्णी यांनी लिहिली असून पटकथासंवादसंगीत आणि दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर सलील कुलकर्णी यांनी स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध केले आहेयाचीही प्रचिती प्रेक्षकांना हा चित्रपट देईल.   

अनेक लोकप्रिय चित्रपटात अलका कुबल यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. स्त्रीधन आणि तुझ्यावाचून करमेना या चित्रपटांसाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. शिवाजी साटम हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले आणि यशस्वी अभिनेते आहेत. १९९७ साली दूरचित्रवाणीवर आलेल्या ‘सीआयडी’ मालिकेतील एसीपी प्रद्युम्न या भूमिकेने ते घराघरात पोहचले आहेत. 

पारंपारिक रीतीरिवाजांपासून आधुनिक फॅशन-तऱ्हा आणि पद्धती यांचा मिलाफ आणि त्यातून भरपूर कौटुंबिक मनोरंजन देणाऱ्या बहुचर्चित वेडिंगचा शिनेमाचा प्रदर्शित झालेला टीझर आणि गाणी यांना रसिकांकडून भरपूर प्रतिसाद लाभला आणि चित्रपटाबद्दल खऱ्या अर्थाने हवा निर्माण झाली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये एका लग्नाची तयारीत्यासाठी केले जाणारे प्री-वेडिंग चित्रीकरणघरातील माणसांची नृत्याची तयारीचालीरीतींवरील चर्चा या गोष्टी ट्रेलरमधून पुढे येतात.

https://youtu.be/FOB-CcbdKS8

वेडिंगचा शिनेमाची प्रस्तुती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटची असून निर्मिती गेरुआ प्रॉडक्शन्स आणि पीइएसबीची आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive