By  
on  

पुन्हा पडणार पैशाचा पाऊस, ‘येरे येरे पैसा २’ या दिवशी होणार रिलीज

मराठी सिनेमांच्या नववर्षाची यशस्वी सुरुवात करणारा सिनेमा म्हणून ‘येरे येरे पैसा’ या सिनेमाकडे पाहिलं जातं. ‘ये रे ये रे पैसा’मुळे मराठी बॉक्स ऑफिसवर पैशाचा पाऊस पडून सुगीचे दिवस आले, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेल्या ‘ये रे ये रे पैसा’ सिनेमावर पुरस्कार सोहळ्यामध्येही पुरस्कारांची बरसात झाली.

https://www.instagram.com/p/Bv4k422l8EJ/?utm_source=ig_web_copy_link

आता या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सिद्ध झाला आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमेने या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. हा सिनेमा १५ ऑगस्टला रसिकांच्या भेटीला येत आहे. प्रसाद ओक, अनिकेत विश्वासराव, आनंद इंगळे, मृण्मयी गोडबोले अशी या सिनेमाची स्टारकास्ट असणार आहे. येरे येरे पैसा 2 चं लेखन ऋषीकेश कोळी यांनी केलं असून अमेय खोपकर, पर्पल बुल एंटरटेंन्मेन्ट आणि ट्रान्स फॅक्स स्टुडिओज या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive