अभिनेत्री प्राजक्ता माळीला फिरण्याची प्रचंड आवड आहे. अनेकदा प्राजक्ताला भटकंती करताना पाहिलं आहे. कधी एखाद्या ट्रॅव्हल कार्यक्रमाच्या माध्यमातून तर कधी सोशल मिडीयावर प्राजक्ताचे ट्रॅव्हल व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळतात.
नुकतच प्राजक्ताने तिच्या हिमाचल प्रदेश येथील ट्रीपचे काही फोटो आणि व्हिडीओ शेयर केले आहेत. यात तिने तिचा एक खास अनुभव शेयर केला आहे. हा अनुभव आहे पॅराग्लायडिंगचा.
हिमाचल प्रदेश येथील जगातील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वाधीक उंच ठिकाणाहून पॅराग्लायडिंग केलं आहे. पॅराग्लायडिंग करतानाचा व्हिडीओही प्राजक्ताने शेयर केला आहे.
यासोबतच प्राजक्ताने काही खास सनसेट फोटोही शेयर केले आहेत. याशिवाय प्राजक्ताने शिव मंदिर बैजनाथलाही भेट दिली आहे. प्राजक्ता या खास ट्रीपचे हे फोटो सोशल मिडीयावर शेयर करत आहे. तिच्या चाहत्यांनाही या पोस्टना पसंती दिली आहे.