लग्नानंतर अभिनेत्री मानसी नाईक आता मिसेस खरेरा बनल्यानंतर तिच्या सासरी हरियाणात आहे. पुण्यात मानसी आणि प्रदीप यांचा विवाहसोहळा पार पडला होता. त्यानंतर दोघं हरियाणात येथे गेले. सध्या मानसीचं सासरी मन रमल्याचं पाहायला मिळतय. हरियाणवी संस्कृती, पद्धती जोपासताना मानसी दिसतेय. मानसीचा पेहरावरही बदलला असल्याचं पाहायला मिळतय. हातात चुडा, पंजाबी ड्रेस, डोक्यावर पदर असा पेहराव पाहायला मिळतोय.
नुकताच मानसीने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत मानसी लिंबाच्या झाडावरून लिंबू तोडताना दिसतेय. मानसीच्या सासरी लिंबाची बाग असल्याचं पाहायला मिळतय, निम्बुडा या गाण्यावर केलेला हा व्हिडीओ आहे.
मानसी या पोस्टमध्ये लिहीते की, “सासर पाहिजे तर असं. मी भारताची मुलगी आहे. दोन्ही माझे जवळचे आहेत माझा महाराष्ट्र आणि खूप प्रेम माझ्या हरियाणाला.” शिवाय या पोस्टमध्ये मानसी लिहीते की, “दुल्हन वही अच्छी जो पिया मन भाये, ससुराल वही अच्छी जहाँ मायके की याद न आये...” तेव्हा सासरी गेल्यावर माहरेची आठवण येणार नाही असं सासर असा उल्लेख तिने केला आहे.