By  
on  

गश्मिर महाजनी आणि पूजा सावंत एकमेकांना करतायत डेट? हा घ्या पुरावा

सोशल मिडीयामुळे कुठली गोष्ट जगासमोर येईल ह्याचा काहीच नेम नसतो. नेटकरी इथली प्रत्येक गोष्ट चांगलीच हेरुन घेतात. आता एक अशीच बहुधा प्रेमाची भानगड आणि तिसुध्दा चक्क सेलिब्रिटींची सोशल मिडीयावर व्हायरल होतेय. मराठी सिनेसृष्टील प्रसिध्द अभिनेत्री पूजा सावंत आणि प्रसिध्द अभिनेता गश्मिर महाजनी यांचं काहीतरी प्रकरण सुरु असल्याचे चॅट्स समोर आले आहेत. 
 

हिंदी आणि मराठी मनोरंजन विश्वात लोकप्रियता मिळवणारा डॅशिंग अभिनेता गश्मीर महाजनीला प्रसिध्द अभिनेत्री पूजा सावंत डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे व्हॅलेंटाइन वीक सुरु असतानाचा या दोघांमधील खास मेसेज समोर आले आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकं काही तरी सुरु असल्याचं म्हटलं जात असलं ती  महत्त्वाचं महणजे गश्मिर हा विवाहीत आहे, हे विसरुन चालणार नाही. पण जर ह्या चर्चा ख-या ठरल्या तर मात्र माध्यमांना चघळायला चांगलीच बातमी मिळेल. 

 

या चॅटमध्ये गश्मिर महाजनी पूजाला तिच्या उद्याच्या म्हणजेच 14 फेब्रुवारी व्हॅलेण्टाईन डेच्या प्लॅनविषयी विचारतोय. तिसुध्दा त्याला तितक्याच उत्साहात रिप्लाय देताना पाहायला मिळतेय. गश्मिर पूजाला तुला 14 तारखेला सरप्राईज मिळणार आहे असंही ह्यात सांगतोय. बहुधा ही प्रेमाची कबुली असू शकते किंवा आणखी कोणतं कारण यामागे आहे ह्याचा उलगडासुध्दा उद्याच होईल . 

दरम्यान, गश्मिर आणि पूजाने बोनस या मराठी सिनेमात यापूर्वी एकत्र काम केलं आहे. या सिनेमातली त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खुप आवडली होती.  
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive