By  
on  

अभिनेत्री पल्लवी वैद्य दिसणार हटके भूमिकेत, एका कार्यक्रमात केलं जाहीर

सध्या सगळ्या महाराष्ट्रात शिवकाळ निर्माण करणारी मलिका म्हणजे ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेने स्वत:चा असा खास चाहतावर्ग निर्माण केला आहे. या मालिकेतील पुतळाबाईंची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री म्हणजे पल्लवी वैद्य. पल्लवीने पुतळबाईंची सोज्वळ सोशिक व्यक्तिरेखा पडद्यावर अतिशय सक्षमपणे साकारली आहे. पण आता पल्लवी एका वेगळ्या रुपात रसिकांसमोर येत आहे. पल्लवी आता ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये कॉमेडी करताना दिसणार आहे. पल्लवीने यापुर्वी कधीच विनोदी भुमिका न केल्याने ती याविषयी खुप उत्साहित आहे. अलीकडेच ‘चला हवा येऊ द्या’मध्ये एक स्कीट सादर केल्यानंतर पल्लवीने ही माहिती दिली. पल्लवीने या कार्यक्रमात अद्वैत दादरकर यांच्यासोबत विनोदी स्कीट सादर केलं होतं.

Recommended

PeepingMoon Exclusive