By  
on  

सुबोध भावे घेऊन येतोय 'नवी गोष्ट'

मराठी सिनेसृष्टीता आघाडीचा अभिनेता सुबोध भावे नेहमीच प्रेक्षकांसमोर नव्या भूमिकेतून समोर येत असतो. अनेकदा चाहत्यांना तो  सरप्राईज करतो. सध्या शुभमंगल ऑनलाईन या मालिकेचा तो निर्माता म्हणूनही ओळखला जातोय. तसंच चंद्र आहे साक्षीला मालिकेतली त्याची भूमिकासुध्दा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरतेय. याशिवाय अभिजीत देशपांडे दिग्दर्शित पावनखिंड या ऐतिहासिक सिनेमात तो वीर बाजीप्रभूंच्या भूमिकेत झळकतोय. अशातच सुबोधने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. लवकरच तो काहीतरी नवीन घेऊन येणार असल्याचं त्यातून दिसतंय.

सुबोध भावेने आपला एक फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. ज्यात तो लेन्समधून पाहताना दिसतोय. या फोटोला त्याने “ गोष्ट चौकटीत मांडायची वेळ आलीये…लवकरच” असं कॅप्शनही दिलं आहे. आता ही नवी गोष्ट काय असणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. आपण उत्सुक असल्याचं, नव्या गोष्टीची वाट पाहत असल्याचं चाहत्यांनी त्याच्या या पोस्टवर कमेंट्स करत सांगितलं आहे. अभिनेता जितेंद्र जोशीनेही “मांडा लगेच, वाट पाहतोय” अशी कमेंटही केलीय़े.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

 

 

आता ही चौकटीत मांडण्याची नवी गोष्ट सुबोध दादाच्या गोष्टीशी संबंधित असेल की सुबोधच्या चाहत्यांसाठी नवं काही असेल किंवा युट्यूब चॅनेल असेस हे लवकरच कळेल . 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive