By  
on  

अभिनेत्री शुभांगी गोखले सोबत झळकणारी ही अभिनेत्री म्हणते "त्यांच्यासोबत स्क्रिन शेयर करणं हा एक आशिर्वाद"

'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका प्रेक्षकांसाठी विविध रंजक वळण घेऊन येत असल्याचं पाहायला मिळतय. या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री दीप्ती केतकर आणि शुभांगी गोखले एकत्र स्क्रिन शेयर करताना दिसत आहेत. शुभांगी गोखले या शकू म्हणजेच शुभांगी खानविलकरची भूमिका साकारत आहेत. तर दीप्ती ही नलू म्हणजेच नलीनी साळवीच्या भूमिकेत आहेत. या दोघी या मालिकेत घट्ट मैत्रिणी दाखवल्या आहेत. मात्र असलं तरी ऑफस्क्रिन दीप्ती ही शुभांगी गोखले यांची मोठी चाहती आहे.

 

दीप्तीने सोशल मिडीयावर नुकतीच एक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून ती शुभांगी गोखले यांच्यासोबत काम करत असल्याचा आनंद व्यक्त करत आहे. दीप्ती तिच्या पोस्टमध्ये लिहीते की, "शुभांगी ताई यांच्यासोबत स्क्रिन शेयर करणं म्हणजे हा एक आशिर्वाद आहे." या शब्दात तिने शुभांगी यांच्याविषयीचा आदर व्यक्त केला आहे. 

या पोस्टसोबत दीप्तीने शुभांगी यांच्यासोबतच्या एकत्र सीन्सचे काही फोटो शेयर केले आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive