By  
on  

पाहा Photos : आस्ताद काळेच्या लग्नात या खास मित्राने लावली होती हजेरी

नुकतच अभिनेता आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांनी लगीनगाठ बांधली. 14 फेब्रुवारी म्हणजे डे च्या दिवशी दोघं विवाहबंधनात अडकले. छोटेखानी सोहळा करून या दोघांनी लगीनगाठ बांधली आहे. पुण्यात दोघांनी रजिस्टर लग्न केलं. यावेळी त्यांच्या कुटुंबासह काही मित्रपरिवारही उपस्थित होते. लग्नाचे विविध कार्यक्रमही त्याआधी पार पडले. 

मनोरंजन विश्वातील काही कलाकार म्हणजेच आस्ताद आणि स्वप्नालीची मित्र मंडळीही या लग्नाला उपस्थित होती. अभिनेता माधव देवचकेनेही मित्राच्या लग्नात हजेरी लावली होती. या लग्नाचे काही खास क्षण त्याने नुकतेच सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. या फोटोत माधव आस्ताद आणि स्वप्नालीला लग्नाच्या शुभेच्छा देताना दिसतोय. 

आस्ताद आणि माधवने याआधी एकत्र काम केलं असून दोघही चांगले मित्र आहेत. याशिवाय दोघांनी मराठी बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणूनही सहभाग घेतला होता. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive