By  
on  

पाहा Photos : असा पार पडला सखी-सुव्रतचा मेहंदी आणि संगीत सोहळा

'दिल दोस्ती दुनियादारी' पासून सुरु झालेली सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांची प्रेमकहाणी अमर फोटो स्टुडिओमध्ये चांगलीच फुलली व आता दोघांनीही पुढचं पाऊल उचललं आहे. आज 11 एप्रिल रोजी सखी-सुव्रत लग्नबेडीत अडकतायत. मध्यंतरी सुव्रत अनेक सिनेमांच्या शूटींगमध्ये आणि अमर फोटो स्टुडिओच्या प्रयोगांमध्ये बिझी होता. तर सखीने परेदेशी शिक्षणासाठी अमर फोटो स्टुडिओ या नाटकातून एक्झीट घेतली. त्यामुळे दोघेही बराच काळ एकमेकांपासून लांब होते पण त्यांच्यातलं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही.

सखी-सुव्रतचा मेहंदी आणि संगीत सोहळा नुकताच पुण्याजवळ धमाकेदार पध्दतीने पार पडला. यावेळी सिनेसृष्टीतले अनेक सेलिब्रिटी आवर्जून उपस्थित होते आणि सर्वांनी यावेळी बेधूंद नाचत भरपूर धम्माल केली.

अभिनेत्री सायली संजीव आणि आरती वाडबाळकर सखीच्या हातावर मेहंदी काढतानाचा हा अप्रतिम फोटो.

[video width="640" height="1136" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2019/04/WhatsApp-Video-2019-04-11-at-3.17.43-AM.mp4"][/video]

सुमीत राघवन, जितेंद्र जोशी, अमेय वाघ , पर्ण पेठे, चिन्मयी सुमीत आदी सर्वच सेलिब्रिटींनी संगीत सोहळ्यात धम्माल उडवून दिली

[video width="640" height="1136" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2019/04/WhatsApp-Video-2019-04-11-at-3.17.43-AM-11.mp4"][/video]

[video width="640" height="1136" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2019/04/WhatsApp-Video-2019-04-11-at-3.17.43-AM-2.mp4"][/video]

 

मराठी सिनेसृष्टीतील हे लव्हबर्डस सुव्रत आणि सखी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं समजताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ते एकमेकांना डेट करतायत याबद्दल सर्वांनाच माहिती होती. पण लग्नाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. ‘टाईम्स ऑफ इंडियाला’ दिलेल्या मुलाखतीमध्ये सखी आणि सुव्रतने लग्नाची तारीख देखील शेअर केली. सखीला याबद्दल विचारलं असता ती म्हणाली, ‘हो मी आणि सुव्रत लग्न करत आहोत. सखी आणि सुव्रत ११ एप्रिलला लग्नबंधनात अडकणार आहेत. या व्यतिरिक्त आणखी काही सांगायला सखीने नकार दिला होता.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive