By  
on  

काळानुसार बदलली आहे लग्नाची व्याख्या -स्नेहलता वसईकर

विवाह ही आपण एक शाश्वत परंपरा मानतो. शतकानुशतके विवाह ही समाज व्यवस्थेतील एक महत्त्वाची घटना समजली जाते पण कालपरत्वे त्यातील परिबळं आणि पती-पत्नीच्या नात्यातल्या पारंपरिक भूमिका कशा बदलल्या आहेत ते पाहणे मोठे रोचक ठरेल.
 
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई ही भव्य मालिका याच विषयाभोवती गुंफलेली आहे. राणी अहिल्याबाई होळकर या कुठल्याही राजेशाही कुटुंबातल्या नव्हत्या, पण एका राजघराण्यात सून बनून प्रवेश करणे ही त्यांच्या भाग्याने घेतलेली एक प्रचंड झेपच होती. सुभेदार मल्हारराव यांच्या नजरेस अहिल्या पडली आणि या लहानग्या मुलीचे आत्मबल पाहून त्यांनी आपला मुलगा खंडेराव याच्यासाठी तिचा हात मागण्याचे ठरवले. परंतु, अहिल्या एका सामान्य घरात जन्मलेली असल्याने त्यांच्या या निर्णयाचे काही फार चांगले स्वागत झाले नाही, विशेषतः त्यांची पत्नी गौतमाबाई यांनी तर आपला ठाम विरोध दर्शवला. गौतमाबाईंची भूमिका करणार्‍या स्नेहलता वसईकर या प्रसिद्ध अभिनेत्रीला वाटते की, कालपरत्वे विवाह संस्थेचा अर्थ आणि त्यातील परिबळं बदलत चालली आहेत.


 
आपले विचार मांडताना स्नेहलता वसईकर म्हणते, “17व्या किंवा 18व्या शतकात विवाह हे सामाजिक वर्गांच्या चौकटीत अडकलेले होते. पण यात कौतुकाची गोष्ट ही आहे की, त्या काळातही मल्हारराव होळकरांनी समाजाच्या अपेक्षांना न जुमानता एक पुरोगामी निर्णय घेतला. आणि हा निर्णय पुढे जाता योग्य असल्याचे सिद्धही झाले. विचार करताना मला असे वाटते की, पुरोगामी विचारसरणीचा पाया आधीच घातला गेला होता. लग्नाची व्याख्या काळानुरूप बदलत गेली. आपल्या जोडीदारामध्ये हुद्दा आणि सामाजिक दर्जाच्या पलीकडे पाहण्याचा आजच्या तरुण पिढीचा खुलेपणा दर्शवतो की, एकमेकांबद्दलचा आदर हा विवाहाचा पाया आहे. समाजामध्ये अशाच प्रकारचा बदल होणे हे स्वागतार्ह आणि अपेक्षितही आहे.”
 
बघा, पुण्यश्लोक अहिल्याबाई दर सोमवार ते शुक्रवार रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive