'मिस इंडिया'चा किताब जिंकणारी अभिनेत्री आणि बॉलिवूडमध्ये काही मोजकेच सिनेम करुन आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणारी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नम्रता शिरोडकर. तुमच्यापैकी ब-याच जणांना हे वाचून प्रश्न पडला असेल की, अभिनेत्री नम्रता शिरोडकरचा पती कोण आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता महेश बाबू हा नम्रताचा पती आहे. नुकतंच सोशल मिडीयावर त्याने सर्व दाक्षिणात्य अभिनेत्यांना मागे टाकत सर्वोत्कृष्ठ ठरण्याचा मान मिळवला आहे.
महेश बाबूचे सोशल मिडीयावर एकत्रित फॅन फॉलोईंग 13 अब्ज इतके जबरदस्त आहेत. धनुष, अल्लू अर्जुन, प्रभास या सर्व आघाडीच्या अभिनेत्यांना मागे टाकत महेश बाबू सोशल मिडिया सुपरस्टार ठरला आहे. तो नेहमीच सोशल मिडीयावर आपल्या चाहत्यांशी संवांद साधतो तसंच आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर करतो. त्यामुळे चाहत्यांची त्याला नेहमीच पसंती मिळते. नुकताच त्याचा ‘भारत आने नेनु’ हा सिनेमा सुपरहिट ठरला. सध्या तो आपल्या आगामी सिनेमाची शुटींग डेहराडून, उत्तराखंड येथे करत आहे.
‘भारत आने’ नेनु सिनेमातील त्याच्या भूमिकेचे फक्त प्रेक्षक आणि समिक्षकांनीच कौतुक केले नाही तर बॉक्स ऑफिसवरसुध्दा या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स तोडले. म्हणूनच त्याच्या चाहत्यांना त्याच्या आगामी सिनेमाची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.