उर्मिला मातोंडकरने घेतलं सिद्धिविनायकाचे दर्शन, आदेश बांदेकर यांचं केलं कौतुक

By  
on  

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय पाहायला मिळतेय. उर्मिलाने ट्विटरवर नुकतीच एक पोस्ट शेयर केली आहे. उर्मिलाने नुकतीच सिद्धिविनायक मंदीराला भेट देऊन बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. या पोस्टमध्ये उर्मिलाने काही फोटो शेयर केले आहेत.

या पोस्टमध्ये उर्मिलाने सिद्धिविनायक ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष आदेश बांदेकर यांचही या पोस्टमधून कौतुक केलं आहे. ऐपच्या माध्यमातून बाप्पाचे दर्शन सूलभ झाल्याचं उर्मिला या पोस्टमध्ये सांगतेय. 

उर्मिला या पोस्टमध्ये लिहीते की, "गणपती बाप्पा मोरया, गणपति मंदिर न्यासचे अध्यक्ष व आमचे सहकारी आदेश बांदेकर ह्यांनी विघ्नहर्ता गणेशाच्या दर्शनाला कोरोना मुळे येणारी विघ्ने अँप आणि क्यूआर कोडच्या साहाय्याने दूर केली आहे. बाप्पाचे दर्शन सहज सुलभ झालेले आहे. बाप्पा देशावरील हे कोरोनाचे अरिष्ट दूर करेल."

Recommended

Loading...
Share