By  
on  

पाहा Photos : साज ह्यो तुजा, मराठमोळ्या लुकमध्ये ही अभिनेत्री दिसली इतकी सुंदर

सोशल मिडीयावर अभिनेत्रींचे साडी लुक व्हायरल होताना दिसतात. यातच काही अभिनेत्री पारंपारिक वेशभुषेतील त्यांचे फोटोही सोशल मिडीयावर शेयर करतात. अभिनेत्री प्रिया मराठेने नुकतेच तिचे खास फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. 

या फोटोंमध्ये प्रियाचा मराठमोळा साज पाहायला मिळतोय. पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीत प्रिया सुंदर दिसतेय. प्रियाचा सहकलाकार मंगेश साळवीने हे सुंदर फोटो क्लिक केले आहेत. प्रियाच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली आहे. नथ. चंद्रकोर, हिरवा चुडा अशा सुंदर लुकमध्ये प्रिया दिसतेय.

'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' या मालिकेती प्रियाची नवी एन्ट्री झाली होती. या मालिकेतील नचिकेतच्या आईच्या भूमिकेत प्रिया दिसतेय. या मालिकेतील प्रियाच्या कामाचही कौतुक होत आहे. या मालिकेच्या निमित्ताने प्रिया पहिल्यांदाच अशा प्रकारच्या भूमिकेत दिसत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive