By  
on  

'तू इथे जवळी राहा' म्युझिक व्हिडीओत झळकणार 'फुलपाखरु' फेम यशोमान आपटे

फुलपाखरु या मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता यशोमान आपटे आता एका नव्या रुपात दिसणार आहे. एका खास म्युझिक व्हिडीओच्या माध्यमातून यशोमान दिसेल. तू इथे जवळी रहा या नव्या म्युझिक ्व्हिडीओत यशोमान झळकणार आहे. येत्या 28 फेब्रुवारीला सप्तसूर म्युझिक्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ प्रदर्शित होणार आहे. या गाण्यात यशोमान आणि ज्ञानदा रामतीर्थरकर यांची जोडी पाहायला मिळणार आहे.

तेव्हा मालिकांमध्ये रोमान्स करणारा हा अभिनेता या म्युझिक व्हिडीओच्या माध्यमातून काय कमाल करतोय हे पाहणं महत्त्वाचं ठेरल.

सप्तसूर म्युझिक-फिल्मी आऊल स्टुडिओझ या म्युझिक व्हिडिओचे  प्रस्तुतकर्ते आणि साईनाथ राजाध्यक्ष निर्माते आहेत. कृतिक मझीर म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर आहेत. अनिरुद्ध बांदिवडेकर यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. चार्वाक माधुरी यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलं आहे, तर आदित्य नीला यांनी गाणं गायलं आहे. गाण्याचं संगीत संयोजन आणि प्रोग्रॅमिंग ध्रुव मुळे आणि शंतनू सपकाळ यांचं आहे. तर  अंंकित शिंदे आणि दिव्या घाग या गाण्याचे कार्यकारी निर्माते आहेेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive