By  
on  

वडिलांना पहिल्यांदाच रंगभूमीवर काम करताना पाहून शार्दुल पाटकरने व्यक्त केल्या या भावना

गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर शुभ सुरुवात केलेल्या या नाटकाच्या माध्यमातून अभिनेता विजय पाटकर यांनी जवळपास २० वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन केलं आहे. त्यामुळे हे नाटक त्यांच्यासाठी तर खास आहेच. याशिवाय त्यांच्या मुलगा शार्दुल पाटकर याच्यासाठीही खास आहे. कारण शार्दुल पहिल्यांच वडिलांना रंगभूमीवर काम करताना पाहातो आहे.

https://www.instagram.com/p/BvvSEw_Hqc5/?utm_source=ig_web_copy_link

त्यामुळे यावेळी त्याने भावनांना वाट मोकळी करून दिली. वडिलांच्या या पुनरागमनाबद्दल शार्दुल म्हणतो, ''मला बाबांना रंगभूमीवर पाहताना खूप भरून आले. लहानपणापासून त्यांना सिनेमात आणि मालिकांमध्ये मी पाहिले आहे. मात्र रंगभूमीवरील त्यांचा अभिनय मी पहिल्यांदाच पाहिला. नाटक पाहताना एकीकडे त्यांच्या पंचवर मी खळखळून हसलो तर दुसरीकडे त्यांच्या इमोशनल डायलॉग्जवर मी भावुकदेखील झालो. त्यांना नाटकात पाहण्याची माझी बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा होती ती आता पूर्ण झाली.’ स्वरूप रिक्रिएशन अँड मीडिया प्रा. लि. निर्मित व अष्टविनायक प्रकाशित या नाटकाचे दिग्दर्शन अनिकेत पाटील याने केले असून, त्याचे लेखन संजय जमखंडी आणि वैभव सानप यांनी केले आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive