सर्वत्र लोकसभा निवडणूकांचा डंका पिटला आहे. निवडणूकांचेच वारे वाहतायत मग ह्यात सेलिब्रिटी कसे मागे राहतील. अनेक सेलिब्रिटींचं नाव सध्या राजकीय वर्तुळात घेतलं जातंय. ते सेलिब्रिटीसुध्दा तितक्याच जोशात सक्रीय राजकारणात उतरले आहेत. या सेलिब्रिटींमध्ये मध्यंतरी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर याचं नाव घेतलं जातं होतं आणि त्यांचा एक फोटोसुध्दा व्हायरल होत होता. पण या अफवा असल्याचा खुलासा खुद्द नाना पाटेकर यांनीच ट्विटरवरुन केला आहे.
नाना पाटेकर म्हणतात,"नाम फाऊंडेशन निमित्त अनेकदा गावोगावी प्रवास होतो तिथे लोक प्रेमाने व आपुलकीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतात पण काहीजण या फोटोंचा गैरवापर करत असल्याचे लक्षात येतेय. मी कुठल्याही राजकीय पक्ष किंवा राजकीय उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही."
https://twitter.com/nanagpatekar/status/1113255539335499776
नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची संयुक्त नाम फाऊंडेशन ही संस्था महाराष्ट्रात्या खेड्यापाड्यातील शेतकरी आणि गरजवंतांसाठी काम करणारी समाजसेवी संस्था आहे.